Description

प्रत्येक मुलात एक सुपर हिरो दडलेला असतो ,त्याला खूप प्रश्न असतात एकाचे उत्तर दिले की लगेच दुसरा प्रश्न तयार .समुद्र निळे का?,दिवस रात्र का होते?,ताप का येतो?,पृथ्वी गोल फिरते तर आपण का नाही? असे किती तरी प्रश्न मुलं विचारत असतात ,परंतु बरेच पालक उत्तर दयायच सोडून मुलांना गप्प करतात .सारखे सारखे प्रश्न विचारायचे नाही असा दम देतात, याचमुळे मुलांची जिज्ञासा आपण संपवत चाललोय .कितीतरी सुपर हिरो सामान्य माणूस बनून राहतात.

आज मुलाला हनी सिंग माहित असतो पण आपली गाणकोकिळे बद्दल विचारल तर गुगल कराव लागतं किंवा पुस्तके उघडावे लागतात !आज मुलांना मोबईल, गाड्यांचे नावे तोंडपाठ असतात ,परंतु १० झाडांची माहिती त्यांना नसते. आज मुलाला बॉलीवूड, हॉलीवूड मधले हिरो हेरोईन माहीत आहे परंतु आपल्या रक्षणासाठी शहीद झालेल्या ५ जवानांची माहिती तर दुर ,नाव तरी माहित असते का?

आजही २६/११, कारगिलच्या विरांबद्दल विचारले तर सर्वांच्या कपाळावर आठ्या तयार होतील .

आज फक्त परीक्षेला पडणारे प्रश्न महत्वाचे आहे , असे मुलांच्या मनावर बिंबवले जाते. परंतु जिज्ञासेतून निर्माण झालेले प्रश्न परीक्षेला नाही विचारणार यामुळे दुर्लक्षित केला जातो .

अरेट टेक्नोलाँजी ने विकसित केलेल्या आस लर्निंग अॅप व वेब पोर्टल मध्ये तुम्हाला ५० प्रकारच्या माहितीचा खजिना उपलब्ध करून दिला आहे जो २ ते १० वर्षा पर्यंतच्या मुलांना आणि पालकांना बारेच प्रश्न सोडवायला मदत करेल.

यात पुस्तकातील शिक्षण तर मिळनारच आहे परंतु या मध्ये सायन्स फॅक्ट, देशाचा -राज्याचा इतिहास , शिवाजी महाराज , आंबेडकर सारख्या थोरांच्या संपूर्ण जीवनप्रवास, ३५ प्रकारचा योगा आणि सूर्यनमस्कार, मंत्र , २०० झाडांची माहिती, टाकाऊ – पासून टिकाऊ , बालगीते- बडबडगीते,अंकलिपी, भाषा ज्ञान , इंग्लिश ,गणित , सारख्या माहितीचा खजिना एकाच ठिकाणी आणि तो हि आँडीओ व अॅनिमेटेड वीडीओ स्वरुपात उपलब्ध करून देणारे आस लर्निंग हे पहिले अॅप असेल.

मुलांना अकबर – बिरबलाच्या चातुर्य कथा , बोधकथा, क्रीडा, जनरल नॉलेज , सन -उत्सव, कॉम्पुटर ट्रेनिंग , मूल्य-शिक्षण यासारखे विभाग सुद्धा यात आहे.

वेगळेपण म्हणजे १९४७ नंतर झालेल्या युद्धातील व हल्यातील जिगरबाज सैनिक व पोलीस अधिकाऱ्यांच्या साहसकथा ज्या आजच्या पिढीला प्रेरणा देतील ते हि आँडीओ व विडीओ स्वरुपात.

याचे महत्वाचे एक वैशिष्ठ म्हणजे , आठवड्याच्या ७ वारांना ७ प्रकारच्या माहितीचा खजिना रोज मिळेल.

© Arete Technology. All rights reserved.